पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्षमा जर आपण दुसऱ्यास न केली, तर आपण क्षमेस पात्र होऊं काय? ७ आपल्याच्याने दुसऱ्यास यत्किंचित कामांत क्षमा करवत नाही, तर परमेश्वरास काय ह्मणून प्रार्थना करावी? ८ सर्व शिक्षेत जबरदस्त शिक्षा क्षमा होय. ( पण योग्य पात्रास.) ९ मुद्दाम अपराध करणाऱ्यास क्षमा योग्य नाही. १० बुद्धिपूर्वक अपराध करणाऱ्यास क्षमा करणे हे आपल्या व त्या च्या नाशास कारण होय. ११ आपराध करणाऱ्यास शिक्षा करणे ती त्याच्यावर वैर घेण्यास करित नाहीत; परंतु पुनः अपराध होऊं नये हा हेतु आहे, तर सारासार विचार करून त्यांत क्षमेचा भाग जितका जाईल तितका घालावा. १२ क्षमा केल्याने पश्चात्ताप न होतां अखेरीस आनंदच होईल. १३ हुकमती पेक्षा क्षमेचा दरारा वजनशीर व टिकाऊ असतो. दया. १ दया ह्या शद्वाचा अर्थ निर्बळास मदत करणे. २ दया अयोग्य ठिकाणी वापरू नये. ३ दयेशिवाय मनुष्याचें चालणार नाही. ४ दया हे धर्माचे बीज आहे. ५ दयेशिवाय दान होत नाही. ६ अनाथाची दाद दयेशिवाय दुसरा कोणी घेणार आहे काय?