पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चैनी कामाधीन, निर्वळ, क्रोधी संतापी व आपली चूक नाकबूल करणारा दुसन्याला हलकें मानणारा असा असतो मतलब हे त्याचे मुख्य लक्षण होय. व्यसनी मनुष्य मनांत दुसऱ्यावर उगाच संतापतो व आपल्या कर्मा बद्दल पश्चात्ताप त्याचा मनांत उप्तन्न होतो. आपल्या व्यसनामुळे आपले किती नुकसान झाले हे त्याच्या मनांत एखादे वेळेस येते त्यावेळेस मात्र त्यास वाईट वाटते; परंतु तें तो बाहेर दाखवीत नाही उलट व्यसनांमध्ये काय काय फायदे आहेत ते तो मोठ्या उत्कंठेने सांगतो. व आपल्या गोठांत दुसऱ्याला ओढण्याचा प्रयत्न करितो. यास्तव सर्वाने सावध राहावे व जे त्यांच्या सपाट्यांत सांपडले असतील त्यांनी आपली आहुती दुःखडोहांत पडणार आहे असे समजून आ पली ताबडतोब सुटका करून घ्यावी. * ७ ज्ञानी पुरुषाचे व्यसन विद्या, कीर्ति, दान, परोपकार हे होत. क्षमा. १ क्षमा ह्मणजे दैवयोगानें, झालेला अपराध माफ करणे...' २ क्षमा ही उदार मनुष्या खेरीज दुसऱ्याजवळ सांपडेल काय? ३ क्षमेनें शत्रुभाव नाहीसा होतो. ४ क्षमा ही आपण ज्या मनुष्यास केली त्याच्याकडून आपला दुसरा अपराध बहूत करून घडत नाही. क्षमेने आपल्या विषयीं दुसऱ्याच्या मनांत पूज्यभाव उप्तन्न होतो.