पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्याच अप्रमाणिकपणामुळे आपणावर पडला नाही काय ? विचार करा की, अप्रामाणीक मनुष्याला प्रामाणीक मनुष्या पेक्षा किती व्याज ज्यास्त पडते, किंवा त्याच्या कामांत किती अडचण व त्रास पडतो. १३ प्रामाणीकपणाने एकतर आपल्या हातून खर्च जास्त होत नाही. (आपलें अंथरूण पाहून आपल्याला खर्च करण्याचे ज्ञान होतें) ह्यामुळे आपण कर्ज बाजारी न होतां काळजी पासून मुक्त राहोतो. ऐक्य. १ ऐक्य ह्या शद्वाचा अर्थ संप, जूट, किंवा एक विचार असणे. २ एकोप्यान राहील्याने सुख मिळतें, भय उत्पन्न होत नाही, दसऱ्याचे ओशाळे रहावे लागत नाही, कोणाचें दास्यत्व करावे लागत नाही, स्वतंत्रता नष्ट होत नाही, कोणी आपला अपमान करूं शकत नाही, व कोणी आपल्या विषयी मनात हलका विचार आणूं शकत नाही. ३ एकोप्याने महत्कार्य निर्विघ्न पणे पार पडतात. ४ एकोपा हाच जयाचा मूळ शकून आहे. ५ एक विचाराने आरंभिलले काम पार पडण्यास उशीर लागत नाही. ६ एकोप्याने शत्रु हतवर्यि होतो. ७ चांगल्या कामांत एकी करण्या विषयीं विलंब लावू नये. ८ कोणत्याही चांगल्या कामांत ज्या मनुष्याशी आपला एक