पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

र उद्योगा वांचून लाम, कीर्ति, आनंद, सुख, आबादी, ही प्राप्त होत नाहीत. ९ विचार करा, द्रव्य मिळविलेला, दरज्याला चढलेला, अबुला पाव लेला, स्तुतीप्त योग्य झालेला, राज्यद्वारी काम करणारा, मोक्षाला पोहोचलेला ह्यांत कोणत्याही उद्योगी पुरुषा शिवाय कोणाचा ही प्रवेश झाला आहे काय ? १० जो सकाळ पासून सांयकाळ पर्यंत उद्योग करितो, तो रात्री सुखाने निजतो, व जो लहानपणी विद्याउद्योगाने पारपडतो तो तारुण्यांत त्याचे फळ पावतो. व जो तारुण्यांत कष्ट करून द्रव्य संग्रह करितो तो वृद्धापकाळी सुख पावतो त्या मुळे त्याला पश्चात्ताप होत नाही. ११ उद्योगहीन मनुष्य स्वतःलाच बोजा होतो, कारण उद्योग नसल्याने मटतेच तरंग आणि कल्पना मनांत येऊन जे काही काम करावयाचं तही त्याला सुचत नाहीं, व तो उगाच परमेश्वराला व अन्य मनुष्याला दोष देतो. १२ उद्योगहीन मनुष्य आंबा खाण्यास इच्छितो, परंतु आंब्याचा देंठ काढूं शकत नाही ( मेहनतीला कंटाळल्या मुळे, ) व तो वृथानशीवावर दोष देतो. १३ उद्योगहीन मनुष्याला काम किंवा मेहनत नसल्याने त्याला वारंवार दुखणी होतात, त्याला कामकरण्याची इच्छा होते, परंतु त्याच्या गती आणि चेतना रहात नाही, त्याचे मन अंधारांत राहते. त्याचे विचार सुदृढ नसतात त्यामुळे ते नेहमी डळमळीत असतात, तो विद्वान होण्यास इच्छितो, परंतु त्याच्याने