पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्योग १ उद्योग ह्मणजे मेहनत किंवा श्रम अथवा कष्ट. २ उद्योग करण्यांत माणसाने गत दिवसांचा विचारही मनांत आणू नये की, आपण ते दिवस वृथा घालविलें. किंवा या पुढे करूं असाही मनांत ठराव करूनये. कारण गत दिवसांचा आपण उपयोग करूं शकत नाही आणि पुढचे दिवस कसे येतील हे ही आपणास कळत नाही तेव्हां वर्तमानकाळचा जो आपल्याने उपयोग होईल तो करावा हे उत्तम. दूसऱ्या कलमांत 'पुढे करूं' असा ठराव मनांत करूं नये. ह्याचा अर्थ में काम आता होऊ शकते ते भविष्यावर ठेवू नये, कारण शेत करण्याचे मनांत आले ह्मणजे ते त्याच्या ऋतू वर केले पाहिजे. कारण वेळे शिवाय कार्य सिद्धीस जात नाही. आळसा पासून सुटण्यात प्रथम प्रयत्न करावा आणि मग उद्योगास लागावें. स्तुत्य उद्योगांत जितके वेळ आपण निराश हाऊ तितकें तो उद्योग पार पडण्यास आपण जास्त योग्य होऊ. कोणत्याही उद्योगास आपण ज्या वेळी निराश होऊं त्या वेळेस तो उद्योग पार न पाडण्यास आपली कोणती चूक कारण झाली हे आपणांस कळते. तेव्हां पुनरपी उद्योग करणे हाच आपला शिक्षक कां न ह्मणावा ? ७ उद्योगा शिवाय तंगी, दुःख, कंटाळा, शरम, काळजी हो जात नाहीत.