पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मेहनत होत नाही. आणि त्याचा शरम, लज्जा, संताप, दुःख शोक, दारिद्यावस्था ह्यांत शेवट होतो. परोपकार. १ परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे किंवा दुसऱ्यास मदत करणे. उपकाराचा अर्थ अशक्ताचे रक्षण करून आपली फर्न आदा, करणे होय. मनुष्याला एक मेकाच्या साह्या (उपकारा) वांचून चालत नाही. ४ पशुपक्षी व मनुष्य ह्यांचे काम म्हणजे मेहनत सारखीच आहे. परंतु मनुष्याचे जास्ती हेच की, त्याच्या कामांत काही तरी परोपकार असतो. उपकार हा श्रीमंतांनीच करावा असे नाही. कारण गरीबही आपल्या शक्ती प्रमाणे दुसऱ्यास मदत करू शकतो. ज्यावर आपण उपकार करितो त्या विषयी एकंदर त्याच्या मनांत आपल्याबद्दल पुज्य बुद्धिउप्तन्न होते. जितका आपण परोपकार करितो तितकें आपणांस साह्य किंवा प्रत्युपकार करितों असें होत नाही काय ? कारण जितक्या मनुष्यांवर आपण उपकार करितों तितकी मनुष्य ( कृतघ्न शिवाय करून) आपल्याला साह्य किंवा प्रत्युपकार करण्यास वेळेवर तयार होत नाहीत काय? उपकारी मनुष्याचे एक तर अंतःकरण शांत व सुखी असते.