पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ क्रोधाने अन्न अंगी लागत नाही. चैन पडत नाही, आणि विकत दुखणे घेतल्या सारखे होते. ५ क्रोध ही एक निवळतेची निशाणी आहे. ६ क्रोधाच्या पाठमिागे पश्चात्ताप अवश्य होतो. क्रोध आला तर तो कोणच्या कारणाने आला, आणि तें कारण योग्य किंवा अयोग्य आहे, हे जर विचार करून पहाल तर तुमाला कळून येईल की, क्रोध यण्या सारखी कीती थोडी कारणे आहेत. ८ क्रोधांत कांहीं काम करणे, हे, तुफानांत जहाज ढकलल्या सारखे आहे. ९ जसा पाण्याने अग्नि सांत होतो तद्वत् नम्र वाणीने दुसऱ्याचा क्रोध शांत होतो. १० क्रोधाला सावरण्यापेक्षां तो येऊंच न देणे हा उत्तम मार्ग होय. ११ दुसऱ्याने आपल्याला शिव्या दिल्या, किंवा वाईट शब्द बोलला तर आपण आपली तबीयेत घालवूनये, कारण त्यांत मूर्खपणा आहे; परंतु तो पुन्हां असें न करील ह्याबद्दल उपाय योजावा व त्याला अपशब्द बोलण्यास आपल्या कडून काही कारण हाऊ देऊ नये. आपण ज्यावेळेस दुसऱ्याला क्रोधांत पाहतो, त्यावेळेस आपण त्याच्या अकलेबद्दल हासतो, परंतु आपल्याला ज्यावेळेस क्रोधाने वेष्टिले असते ( आपल्या मूर्खपणामुळे )त्यावेळेस आपल्या मनांत हा विचारही येत नाही की, लोक आपल्याला मूर्ख ह्मणत नसतील काय ? १२