पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ मोहित होणे ह्मणजे माया किंवा खोट्या प्रीतीत गर्क होणे. ज्याच्या डोळ्यांत कावीळ ( कमळा ) असते, त्याला जसे सर्व पिवळे दिसते, तसे मोहित मनुष्याला सर्व काही उलटें दिसते. मोहित मनुष्य मागचापुढचा विचार न करितां कर्म करितो. व पुढे पश्चात्ताप व दुःख पावतो. मोहित मनुष्य आपला मान अपमान किंवा नफा तोटाही समजू शकत नाही. ९ मोह ह्या सारखा दुसरा शत्रु नाही. १० मोहित मनुष्य अखेरीस शोकांत नाश पावतो, व त्यामुळे तो आपल्या दुःखकारकमुशाफरीतून सुटतो. क्रोध १ क्रोध ह्या शब्दाचा अर्थ, कारण नसतां रागावणे, ह्मणजे दुसऱ्याच्या गुन्ह्याबद्दल स्वतःस शिक्षा करून घेणे. रागाला जर योग्य कारण असले तर संताप आपोआप होतो. ह्मणजे त्याचे तोंड वाजत नाही. क्रोध आणणे ह्यणजे आपल्या मूर्खपणाबद्दल दुसऱ्या जवळ सरटिर्फिकेट मागणे, असे कां बरें न ह्मणावं ? कारण क्रोधी स्वतःच्या मनाला देखील ताब्यांत ठेवू शकत नाही, तेव्हां तो दुसऱ्याचे उपयोगी पडेल कत्ता ? आणि स्वतःला तर तो उपयोगी नाही, यास्तव तो मात्र दुसऱ्याला बोजारूप होय.