पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबाराव जयराम भीशेकृत शतप्रश्नावलि. १ नर ह्मणजे काय---दृढनिश्चयी प्राणि.. श्रीमान् कोण-दुसऱ्यास सुख देण्याचे ज्याजवळ आहे तो. सभा कशास ह्मणावी--जीत दुःख निवारणार्थ बहुमताने विचार होतात तीस. मान झणजे काय--शुभकामे करणाऱ्याविषयी लोकांची पूज्यबुद्धि. ५ अपमानाचे वीज कोठे आहे--चुकीत. ६ मनाची तृप्ती कशांत आहे--संतोषांत. प्रिती संपादन करण्याचा मार्ग कोणता--दुसऱ्याचे शुभ करण्याचा प्रयत्न. अक्षय सुखद असें दान कोणतें--विद्या. विद्या कशी आहे--अंधारांत दीपकासारखी. १० अंधार कोठे रहातो--ज्यांत आपण अज्ञान आहों तेथें. ११ आपली शक्ति कशांत आहे-ज्याविषयी आपणास ज्ञान आहे त्यांत. १२ भय कशांत आहे. दुसऱ्याला पीडा होईल असें कर्म करण्यांत. १३ दुःखाचे घर कोणतें- अज्ञानता. १४ आपल्या योग्यतेचा जास्त प्रकाश कशाने पडेल--नम्रतेने १५ कंटाळा कोठे आहे--निरुद्योगीपणांत. १६ निरुत्साह कोठे आहे-बुज ह्मणने योग्य उत्तेजन नाही तेथे