पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८५ मेळ ह्मणजे काय -मनाची अशुध्दता ८६ सर्वात चीकट कोण-माया ८७ उत्तम वेळ कोणती--ज्या वेळेस परोपकाराची व चागली - कामे होतात ती. ८८ दुष्ट विकारापासून मनाला शांतता केव्हां मिळते--जेव्हां आपण उद्योगांत असतो तेव्हां . ८९ मनाची खरी खातरी करणारा गुरु कोण–पुनः उद्योग करणे ९. बुध्दिहीन कोण--सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून राहणारा. ९१ मोठा क्षय कोणता--मनाची अस्वस्थता ९२ श्रेष्ट कोण-ज्याच्या विषयी आपली पूज्य बुध्दि असेल तो ९३ कपटी कोण -ज्याच्यामध्ये पराक्रम नाहीं तो ९१ न्याय झणजे काय--दोन्हीपक्षाचे समाधान होणे [ शांत होणे ९५ भ्रष्ट कोण--जो आपल्या कर्तव्यकर्मापासून चळला तो ९१ व्यवहार कोणता-ज्यापासून परस्परास अडचण न येतां सुख होईल तो. ९. सुखी राष्ट्र कोणते--जेथे बहुमताने कार्य होते तें. ९८ निंदक कोण--अल्पबुध्दिमान् ९९ नांव कोणाला आहे--जो दुसऱ्याच्या उपयोगी आहे त्याला१.. धर्माने कां वागावे--मनाला शांतता ठेवून जीवित सुखांत नाण्याकरिता.