पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० मार्ग कोणता—सुज्ञ थोर लोक जातील तो।। ७१ विचार करून करणाऱ्यास काय लाभ-त्याचा इतरापेक्षा अधिक जय होतो ७२ आश्चर्य कोणत-रोज रोज प्राणी मरतात आणि बाकीचे आप णास चीरंजीव समजतात. ७३ अक्षय नर्कवास कशाच्या योगानें प्राप्त होतो--धन जवळ असून दान व उपयोग न करता धन नाही ह्मणणे. ७४ धर्म, अर्थ, काम, हे तिन्ही परस्परविरुद्ध आहेत ते कशाच्या योगाने एकत्र होतात-स्त्रिपुरुष हे उभयता धर्माने वागणारी असली ह्मणजे हे तिन्ही एकत्र राहातात. ७५ सुखोपभोग घेणारा बुद्धिवान लोकामध्ये मान्य असा जीवंत असता मेलेला असा कोण--देव, अतिथी, आप्तवर्ग, वडील वं आत्मा यांस जो संतुष्ट ठेवीत नाहीं तो. ७६ सनातन ह्मणजे त्रिकाळबाधीत असा धर्म कोणता--जो- मोक्ष देतो तो. ७७ अंतःकरणांतून दया वजा केली तर बाकी काय राहील--घात कीपणा व जुलूम. ७८ दुर्लभ वस्तु कोणती—मनुष्य देहांत येऊन मोक्ष साधन करणे ७९ दुःख कोणतें—अपमान ८० सुख कोणतें—साधु संगती ८१ मोठे पाप कोणतें--परनिंदा ८२ सर्व अपराध कोठून उत्पन्न होतात-एकांतांतून ८३ लोखंडापेक्षां कठीण कोण-कृपण ८४ लोण्यापेक्षां मऊ कोण--साधु