पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ मनुष्याचा दुर्जय शत्रु कोण-क्रोध. ४८ मोठा रोग कोणता-लोभ. -- ४९ साधु कोण--सर्वांस हितकारक तो. REET ६० मोह कोणता-धर्म न समजणे. -MER ५१ लाभ कोणता-सत्समागम. मला ५२ मानी ह्मणजे काय--मीच मोठा असे समजणे ५३ आळस कोणता-शास्त्रांत सांगीतलेले आचरण न करणे ५४ शोक कोणता-अज्ञान ५५ कोणत्या गोष्टीस ऋषीने स्थैर्य म्हटले आहे--स्वधर्माच्या ठायीं निश्चल असणे. ५६ धैर्य ह्मणजे काय--इंद्रियनिग्रह तेंच धैर्य ५७ स्नान कशास ह्मणावे--मनाचा मळ घालविणे ह्यास ५८ दान ह्मणजे काय --प्राण्याचे संरक्षण करणे ६९ पंडित कोण-धर्म जाणतो तो ६० मूर्ख कोण---नास्तिक ६१ काम ह्मणजे काय--संसारवासना. ६२ मत्सर कोणता—मनक्षोभ ६३ अंहकार ह्मणजे काय--मोठे अज्ञान ६४ दंभ झणजे काय--धर्माचा बाहेरून डौल घालणे ६६ दैव ह्मणजे काय---दिले असेल त्याप्रमाणे प्राप्त होणे ६६ पैशुन्य म्हणजे काय--दुसऱ्याला दोष लावणे ६७ गोड बोलणारास काय लाभ होतो--तो लोकप्रिय होतो १८ पुष्कळ मित्र असण्यास काय लाभ----तो सुखाने रहातो १९ धर्माविषयीं तप्तर असणारास काय प्राप्त होतें-मोक्ष