पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६१ २३ धनामध्ये श्रेष्ट धन कोणतें--विद्याधन. २४ उत्तम लाभ कोणता--आरोग्य लाभ. हा २५ उत्तम सुख कोणतें--संतोष. २६ मुख्य धर्म कोणता-पिडा न करणे. २७ काय स्वाधीन ठेविलें असतां शोक होत नाही-मन. २८ कोणाची मैत्री कमी होत नाहीं-साधूची. २९ काय टाकिल्याने लोकप्रिय होतो--अभिमान. ३० काय टाकीले असता शोक होत नाही--क्रोध. ३१ काय टाकिल्याने सुखी होतो--लोभ. ३२ नटनर्तकास कशा करीतां द्यावे-लौकिकाकरितां. १३ राजास कां द्यावें--भयनिवृत्ति करितां. ३४ लोक कशाने आच्छादित आहेत-सज्ञानाने. ३५ मनुष्य कशाच्या योगाने मित्राचा त्याग करितो-लोभामे. ३६ काय टाकिल्याने धनवान होतो--विषयवासना. ३७ मनुष्य कशाच्या योगाने स्वर्गास जात नाही-विषयसंगामें ३८ मेलेला पुरुष कोणता-दरिद्री ३९ मेलेले राष्ट्र कोणतें-ज्यांत राजा नाही तें १० विष कोणते-याचना ह्मणजे अपायकारक ४१ दम म्हणजे काय-मनाचा निग्रह. ४२ लाज कशाची धरावी-वाईट काम करण्याची. ४३ ज्ञान म्हणजे काय-परमेश्वरत्व समजणे. ४४ शम म्हणजे काय-चित्ताची शांति. ४५ दया म्हणजे काय-सर्वास सुख व्हावे असे इच्छणे. .४६ सरळपणा म्हणजे काय--समदृष्टि.