पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शंकराचार्य कृत. १ विद्वान् कशाने होतो-शास्त्राच्या योगानें. २ ब्रह्मप्राप्ती कशाने होते—तपाने. ३ तप ह्मणजे काय-स्वधर्माचरण. ४ साह्य कशाने होतो.--धैर्याने, ५ बुद्धिमान कशाने होतो.-वृद्धांच्या सहवासाने. ६ भूमीपेक्षा मोठे कोण--माता. ७ आकाशापेक्षा उंच कोण—पिता. ८ वायुपेक्षां चंचळ कोण?-मन. ९ तृणापेक्षां पुष्कळ काय? चिंता. १० तृणापेक्षा हलका कोण?—याचक. ११ प्रवाशांचा मित्र कोण—समुदाय. १२ घरांत राहणाऱ्याचा मित्र कोण-भार्या. १३ रोग्याचा मित्र कोण-वैद्य. १४ मरणाऱ्याचा मित्र कोण--धर्मदान. १५ थंडीचे औषध काय--अग्नि. १६ कशाच्या योगानें कीर्ति अवश्य प्राप्त होते-दातृत्वानें. १७ स्वर्गप्राप्ती कशाच्या योगानें हटकून प्रात्प होते-सत्याने. १८ सुख हटकून कशाच्या योगानें होतें--चांगल्या स्वभावाने १९ देवाने मनुष्यास दिलेला मित्र कोण--भार्या. २०मनुष्याचे उपजीवन काय--पर्जन्य. २१ मनुष्याचे आवश्य कृत्य कोणते--दान. २२ धन मिळविण्यास मुख्य साधन कोणते--दक्षता: