पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९९ आहेत ( "गुरुविलास" शीक लोकांचा प्रसिध्द गुरुगोविंद याणे लिहिलेला.) १४ जो दारू पितो तो स्वतःच्या कुटुंबाचे व स्वतःचे निर्मूल करून करून घेतो [बुद्ध एशियांतील तारा ] १५ दारू कधीही पिऊ नये किंवा तिला स्पर्श करूं नये. [ बोद्ध धर्माची पांचवी आज्ञा. ] १६ पापाचें मूळ कारण दारू आहे. ( मंहमद पैगंबर मुसलमानी धर्माचा अधिकारी.) १७ ज्याच्या योगाने पोटांत अस्वास्थ्य उत्पन्न होऊन मरण येतें अशा विषारी पदार्थात जो कडकपणा असतो त्यापेक्षां दारूंत जास्त आहे. [ अलीकडच्या काळांतील नामांकित वैद्य चरक. ) १८ दारू फारच दोषास्पद आहे. सर्वांनी तिचा त्याग करावा. जे शाप दिलेले अतिशूद्र आहेत तेच मात्र ती पितात, ब्राह्मणाच्या, क्षत्रियाच्या व वेश्याच्या स्त्रिने आपला पति पुन्हां जीवंत होईल या आशेनेही ती पिऊ नये. [ राजनीति ] १९ कोणत्याही संकटी ब्राह्मणाने दारू पिऊ नये. पापाच्या भयाने त्यांच्या स्त्रियांनीही ती पिऊ नये. [ भविष्य पुराण.] २० जो ब्राह्मण दारू पितो तो रवरव नरकी जातो व जी स्त्री दारू पिते तीस मरणाअंती देव तिच्या पति जवळ येऊ देत नाही. [ वेद] सर्व भारतवासी आर्य ज्ञान संपन्न होवोत. अस्तु ॥शंकर. समाप्त.