पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ संतोषाशिवाय मनुष्याला शांति मिळत नाही. ७ संतोष ठेवण्याचा मुख्य हेतु आपले आयुष्य सुखांत जावें. ८ संतोष न राहण्याचे मुख्य कारण आपल्या स्वतांविषयी उगा च मोठे मत बांधणे. ९ संतोष ठेवण्याचा मुख्य उपाय आपली खरी योग्यता काय आहे व आपली खरी स्थिति काय आहे, आणि योग्यतेपेक्षा आपली स्थिति किती बरी आहे, हे निरपेक्ष बुद्धीने मनास विचारावें. १० संतोष हा परमेश्वराने सर्व ठिकाणी ठेविला आहे. कोणती ही स्थिति (कितीही वाईट ) असो त्यांत, कांहीतरी संतोष मानण्यास कारण असतेच. ११ संतोष न ठेवणाराजवळ हमेश संताप आणि निंदा ह्याशिवाय काही राहत नाही. १२ संतोष न ठेवणारा मनुष्य दुसऱ्यास त्रासदायक होतो. १३ सारांश जो मनुष्य संतोष ठेवित नाही, तो मोठा अभागी जाणावा. कारण तो दुःखी असतो व दुःखी तोच अभागी. मोह १ मोह ह्मणजे खरे स्वरूप न कळणे किंवा भुलणे. २ जेव्हां ज्ञानेंद्रिय नाहीसे होते किंवा त्याचे चालूशकत नाही तेव्हां मोह उत्पन्न होतो. ज्याला मोह उप्तन्न झाला. त्याच्या सर्वांगाभोंवती शोक व्यापून राहतो. ४ मोहित मनुष्य आपण होऊन दास्यत्व कबूल करितो.