पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ त्यांचाशी मुळीच संबंध ठेवू नये, त्यांच्यावर दया करूं नये, किंवा त्यांचाबरोबर आनंदाने बोलूही नये अशी मनूची आज्ञा आहे. [ मनु ९-२३७-२३९ ] स्त्री अथवा पुरुष याणी दारू पिऊ नये कारण त्यापासून पाप व अनर्थ घडतात. [ भविष्यपुराण. ] जो ब्राह्मण दारू देतो व पितो तो ब्रह्मकर्म करण्यास अपवित्र होय; ह्मणजे ब्राह्मणांस जे हक्क आहेत त्यांस तो मुकतो [ कल्किपुराण.] ८ आपला उर्जितकाल यावा अशी ज्याची इच्छा असेल त्याने दारू पिऊ नये. (भैरवस्तोत्र ) ८ आपलें व्यसन पुरे करण्यासाठी जो ब्राह्मण दारू पितो . त्याने त्यापेक्षां मरावें हे उत्तम. ( स्मृतिसूक्त महातंत्र. ) १० हे नारदा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि स्त्रियानी दारू पिऊ नये. ( वरुणपुराण. ) ११ या दिवसापासून पुढे या जगांत दुष्ट ब्राह्मण अज्ञानपणांतही मादक दारू पिईल तर त्यास जातिबाह्य टाकावे आणि ब्रह्म हत्येचं त्यास पातक लागेल. त्याचा या जगांत सर्व लोक द्वेष करतील व परलोकांतही तोच मासला. [ शुक्राचार्याचा शाप महाभारत आदिपर्व भाग १९ ] १२ अलीकडच्या काळांत जो मोठा तत्ववेत्ता होऊन गेला व ज्यास प्रति ईश्वर मानतात तो शुक्राचार्य ह्मणतो, ज्ञानप्राप्तीच्या कामांत दारू हा एक मोठा अडथळा आहे आणि म्हणून तिच्या सावलीस स्पर्श करू नये. १३ जो दारू पितो त्याच्या यात्रा, देवधर्म, जपजाप्य, फुकट