पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५७ दारू. १ मादक दारू पिऊ नये किंवा घेऊ नये. ( वेद.) २ ब्रह्महत्या; मादक दारूचे सेवन. ब्राह्मणाच्या द्रव्याचे हरण, गुरुस्त्रीगमन ही चार मोठी भयंकर पा होत आणि त्यांसवीशी नेहमी संबंध ठेवणे हे पांचवें महा पातक होय. [ मनु.११-५४) ३ अज्ञानाने जर एखादा ब्राह्मण, क्षत्रीय अथवा वैश्य दारू पिईल तर ती त्याने उन करून प्यावी कारण तेणे करून त्याचे सर्व शरीर भाजेल व तो पापापासून दूर होईल. अथवा तप्तगोमूत्र, पाणी, दुध, तुप, अथवा पाण्यांत कालावलेले गाईचे शेण हे पदार्थ त्याने जन्मपर्यंत खात असावें. ( मनु ११ ७०-९१) दारूच्या गुंगीत एखादा ब्राह्मण अस्वच्छ जागेत पडेल, वेदाक्षरें भलत्याच ठिकाणी उच्चारील अथवा मूर्खपणाचे कृत्य करील ह्मणून ब्राह्मणाने दारू पिऊ नये [ मनु ११-७-६] वर सांगितल्याप्रमाणे जो अचरण करणार नाही त्यास राजाने पुढील शिक्षा करावी. गुरुस्त्रीगमन करील तर त्याच्या कपाळावर "भग" असा डाग द्यावा; दारू पिईल तर त्या दारूच्या भांड्याचा डाग द्यावा; द्रव्य हरण करील तर कुत्र्याच्या पायाचा डाग द्यावा; अशा लोकांबरोबर पंक्तिव्यवहार करू नये. त्यास कोणीही विद्या शिकवू नये. विवाह संबंध करू नये अशा रीतीने त्यास जातिबाह्य केल्यावर तो भटंगा सारखे जिकडे तिकडे भटक्या मारीत वसेल त्यांच्या नातेवाईकांनी