पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्तानांत सुस्थिती केव्हां प्राप्त होईल ? १ जेव्हां प्रत्यक्ष व्यापार आर्यवाशी जनांच्या हाती येईल तेव्हां २ जेव्हां समान सुट व हक्क आर्यांना प्राप्त होतील तेव्हां. ३ जेव्हां आर्यबाशी एकमेकाची ईर्षा सोडून ऐक्य करतील तेव्हां. १ जेव्हां आर्यवाशी स्वतांचे कल्याण सोडून, देशहितासाठी स्वतास घस घेतील तेव्हां. ५ नव्हां आर्यवाशी पोकळमान आणि दिखाऊ देशाभिमानीपणा सोडतील तेव्हां. कुटुंबगृह कोठे आहे ? जेथे कुटुंबातील सर्व मनुष्य एकमेकाशी प्रमाने वागतात. एक मेकाची ईर्षा न करता सर्वांची मने एकमेकाविषयी शुद्ध आहेत. कोणताही पदार्थ सर्वास वाटून आनंदाने खातात. घरच्यास सोडून परक्यास मिळत नाहीत. एकमेकांच्या सुख दुःखांत संभागी होतात तेथें. मनुष्य इह व देवलोक साध्य केव्हां करूं शकेल ? सर्वत्र योग्य दया आणि क्षमेने वागेल. क्रोधास सोडील. परद्वार न पाहील, सत्य नम्रपणाने वागेल, कर्तव्य आदा करील. यम. नाधीन न होतां ज्ञानसंपन्न होईल तेव्हां मानव प्राणि व परलोक साध्य करू शकेल.