पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ असे धारिलें कीं, पदार्थांचा लय होणे किंवा उत्पत्ति होणे ह्यास . परमेश्वर कारण नाही; परंतु ही एक स्वाभाविक शक्ति आहे. तरी स्वाभाविक शक्ति काय, हे तरी माहित असले पाहिजे ना? नास्तिक ह्मणतात ह्या शक्तिविषयी मात्र आपण अज्ञान आहों. व ही शक्ति परमेश्वराची कृती होय, असें आस्तिक मानतात तर हे मानणे जास्त सयुक्तिक दिसते. कारण जर कायदा'. आहे तर त्या तरी कायद्याचा कर्ता कोणी असला पाहिजे, ह्याचप्रमाणे शक्ती चा कोणी स्वामी असला पाहिजे व तो परमेश्वर होय. परमेश्वराला आपल्या कर्तव्यकर्माचा जाब द्यावयाचा आहे. असे समजून, व आपल्या कर्तव्याप्रमाणे आपणास त्याच्या पासून फळ मिळावयाचे आहे असे समजून प्रत्येक प्राण्याने नीतीने वागावें. म्हणजे ज्यापासून दुसऱ्याच्या मनाला कोण. तेही प्रकारे आपणाकडून गैरवर्तणूक झाली असे वाट' णार नाही. परचरण. ध्यानांत ठेवा. मनन करा, मनन करा, विचार करा, विचार करा, जन्मास येऊन काय केले ह्याची आठवण धरा. त्वरा करा आणि सावध व्हा! वेळ जात आहे काळ येत आहे.