पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवी किंवा महामाया म्हणतात. ह्याप्रमाणे तो त्याच्या प्रत्येक गुण व कार्यावरून लोक त्याला निरनिराळ्या नावाने ओकखितात. तो सर्व शक्तिमान् निराकार, अविनाशी, शान्तिरूप सर्व तो ज्ञानी, सर्वतोगामी, निरंजन, न्यायी, अंतरसाक्षी व सर्व ठिकाणी 'विराजमान आहे. परमेश्वर त्याच्या जवळ कोणी कांहीं, मागावयास गेला तर तो त्याला झिडकारून टाकीत नाही; परंतु ज्या वेळेस त्याला त्याची बळकट इच्छा आहे असे वाटेल, त्या वेळेस तो त्याच्या मनांत प्रेरणा करतो. व त्याच्या जवळूनच त्याबद्दल उद्योग करवून त्याला ती वस्तु प्राप्त करवून देववितो. कारण यानेच जर त्याला झिडकारून टाकीलें तर त्याला कोठे थारा मिळणार आहे? परमेश्वराच्या ठायीं विश्वास न ठेवला, तर मनास शांतता कशाने उत्पन्न होईल? व त्या शांततेशिवाय सुख नाही. परमेश्वर नाही असें मानिने, तर आपणापेक्षां कोणी ह्या भूतलावर श्रेष्ठ नाही. यास्तव सर्व वस्तूची उत्पत्ति व लय कसा होतो व काय कारणाने होतो. सर्व चमत्कार कशाच्या योगाने होतात, हे आपणास माहित असले पाहिजे. आपणास आपल्या मर्जीप्रमाणे सर्व काही करण्याची शक्ति असली पाहिजे. कोणत्याही वस्तु [ जड व चंचळ ] बद्दल आपणास दुःख झाले न पाहिजे कारण त्या वस्तूचें नष्टत्व होऊ न देणे ही शक्ति "आपणांत असली पाहिजे, आणि हे सर्व आपणास माहित असले पाहिजे.