पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्यता पावेल हे मात्र लोक मुखाने उच्चारण करून स्वस्थ बसतात. ह्यावरून पुढे करूं ह्या शहाने मन किंवा जन फसत नाही, ह्मणजे आपण निर्दोर्षी आहों, असें ह्मणत नाहीत, परंतु आपणास मात्र ज्यांची अवशक्यता असेल त्याची अडचण किंवा वियोग भोगावा लागतो, ह्यावरून पुढे करूं ह्या वृक्षाचे उत्पत्तिस्थान आळस होय व ह्या वृक्षाचे निरुत्साह हें जळ ह्मणजे जीवित्व होय व विपत्ति, संकट, अडचण ही त्याची फळे होत. पुढे करू हे शब्द महा मलीन होत. कारण ह्या शब्दाच्या उच्चारानेच मनुष्याचे तेज हरण होऊन त्याची शक्ति निर्माल्य होते, त्याच्या अंगी निरुत्साहरूपी विष व्यापून जाते आणि त्या निरुत्साहरुपी विषयाच्या योगाने त्याचे शरीर विपत्तिरूपी रोगाने वेष्टिले जाते. तर पुढे करू हीच साडेसाती नन्हें काय? परमेश्वर. १ परमेश्वर सर्वेश्वर, विष्णु, शंकर, ब्रह्मा, देवी वगैरे त्याची अनंत नावे आहेत. कारण त्याच्या अंगी अनंत शक्ति व सर्व कायांचा कर्ता. त्या त्या कार्यानुरूप त्याचे नाव पडले आहे. तो सर्वांचे रक्षण करतो ह्मणून त्याला, विष्णु ह्मणतात. तो सर्वाचा नाश करितो ह्मणून त्याला शंकर ह्मणतात. तो सर्वांचा उत्पन्न करता आहे ह्मणून त्याला ब्रह्मा म्हणतात. त्याच्या अनंत शक्तीला आदि