पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ होणार? असे असतां “पुढे करूं" [उद्योग ] ह्मणजे ती आवश्यक वस्तु आपणास उशीराने प्राप्त होईल, असे माहीत असतां आळस रूपी मोहपाशांत गर्क होऊन ती लवकर मिळविण्यास्तव प्रयत्न न करणे अर्थात समजून उमजून अडचणीत रहाणारे जे प्राणी ह्या जगतावर ईश्वराच्या व सृष्टीच्या नियमाचा भंग करणारे आहेत; ते जर अडचणीत व संकटांत येतील किंवा त्यांना दुर्दशा प्राप्त होईल तर परमेश्वराने त्यांच्यावर दया केली असें नाहीं कां ? कारण परमेश्वराने ह्यांच्या ( अधमांच्या जे समजत असून खाज्यांत पडणारे आहेत ) उद्धारास्तव दुर्दशारूप शिक्षकाचा वेश घेऊन ह्यांना ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे करूं हे शब्द मनुष्याच्या तोंडांतून केव्हां निघतात, ह्या बद्दल जर विचार केला तर आपणांस कळेल की, तो आळस व कंटाळा ह्याने जेव्हां वेष्टिला गेला तेव्हां आपण आळस व कंटाळा रूपी मदिरेत बेशुद्ध आहों हे इतरास व स्वतःसही न दिसावं यास्तव पुढे करू हा विनाशरूपी जाळीदार पडदा टाकण्याचा जो प्रयत्न करतो, त्याने आपले मन किंवा जन फसले जात नाही. मन अशा विचाराने समाधान मानते की, आपणास ह्या वेळेस कंटाळा आला आहे, तर आपल्याच्याने जो उद्योग करावयाचा तो बराबर होणार नाही. पुढे जलद त्वरेने करून ह्याचा बदला फेडून टाकू. जनाच्या हिताहिताचा कांहींच प्रत्यक्ष संबंध नसतो. यास्तव त्याला ( जनाला ) खोल विचार करयाची काही गरज नसते; परंतु पुढे करूं ह्मणून स्वस्थ बसजारापेक्षां तात्काळ प्रारंभ करणार जास्त व लवकर साफ णार