पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटी बहाणी काढतो व तीरसटपणा करतो. पण जनांत किंवा मनांत आपले अज्ञान कबूल करीत नाही. अखेरीस कपाळावर हात ठेवून नशीबाच्या नावाने रडतो ! परंतु नशीब ह्मणजे काय ह्याचाही तो विचार करीत नाही. देव म्हणजे काही नाही; परंतु केलेल्या कर्माचे फळ होय. या वरून आपल्या स्थितीबद्दल आपणच जोखीमदार नाहीं कां ? दुष्कर्मामुळे त्याचें फळ दुर्दैव प्राप्त झाल्यास तदनिवारणार्थ सत्कर्म हे औषधरूप होय ( ह्यालाच प्रायश्चित्त म्हणतात ) जसे कुपथ्यामुळे शरीरास अस्वस्थता झाल्यावर औषधोपचार केल्याने स्वस्थता प्राप्त होते तव्दत्. पुढे करूं. परमेश्वराने मनुष्य प्राण्याला आपणास आवश्यक वस्तु प्राप्त करून घेण्यास्तव अवयव किंवा साधनें दिली आहेत व ती वस्तु आपणास कशी प्राप्त होईल, ह्याचा विचार करून तदनुरूप आचरण करण्यास्तव ज्ञान दिले आहे. आतां अमुक आवश्यक वस्तु आपणांस कशी मिळेल हा प्रश्न आपल्या ज्ञानतंतुरूपी मंत्रीजवळ ठेवला, तर लागलाच जाब मिळेल की, उद्योगाने. तर ह्यावरून आवश्यक वस्तूची प्राप्ती उद्योगाने होईल हे तर नक्की ठरले. ज्या उद्योगाच्या अंती आपणास ती वस्तू मिळणार आहे तो उद्योग लवकर केला तर लवकर व उशीराने केला तर उशीराने ती वस्तु प्राप्त नाही का