पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० देव. मनुष्यास ज्याची इच्छा असते ते मिळविण्याचा तो प्रयत्न करितो; परंतु परिणामाचा दूरवर विचार न केल्यामुळे व बेपर्वाई आणि अति घाई याच्या योगाने मी जो प्रयत्न करितो त्याने मला इच्छित वस्तु प्राप्त होईल किंवा नाही, हे त्याला कळत नाही. यास्तव परिणामी जेव्हां त्याला इच्छिलेली वस्तु प्राप्त न होतां उलट तो संकटांत येतो तेव्हां कष्टि होऊन पश्चात्तापांत गर्क होतो. ह्यामुळे त्या संकटांतून पार पडण्याचा उपाय न सूचतां तो अरे देवा, असे म्हणून उगाच दुःख करीत बसतो. ह्मणजे ज्यास्त अज्ञानपणा धारण करतो, त्या वेळेस जन म्हणते किं बिचारा साडेसातीच्या फेऱ्यांत आला, काय करील? मनुष्य ज्याची इच्छा करतो तें त्याला योग्य आहे किंवा नाही, तो ते मिळवू शकेल किंवा नाही. ते मिळविण्यांत त्याला कोण कोणत्या अडचणी येतील, त्या निवारणार्थ कोणते उपाय योजिले पाहिजेत. ती साधनें त्या जवळ आहेत किंवा नाही. ह्याचा विचार केल्या शिवाय आपली इच्छा बळकट करतो व ती पार पाडण्यास प्रयत्न करण्याच्या अगोदर तो असें करीन तसे करीन असें लोकांत प्रसिद्ध करतो. मग जेव्हां ती इच्छा पार पाडण्यास प्रत्यक्ष प्रयत्न करण्यास जातो. तेव्हां हैं किती अवघड काम आहे, हे त्याच्या अनुभवास येते व तो भणिक बद्धीचा असल्याने मनांत त्रासून व कंटाळून जाऊन दैवावर दोष ठेवितो; परंतु जनांत आपले अज्ञान व ते लपवीण्यास ढोंग हे उघडकीस न यावे म्हणून तो नानाप्रकारची