पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४९ शक्ति असून दान न करणे, ह्मणने दयेची निर्भत्सना करून निष्ठुर होणे अथवा अनाथ, अशक्त, गरीब, व जनहितकर्ते यांस साह्य न करतां, त्यांच्या स्थितिविषयी निष्काळजी राहणे ह्मणजे ईश्वराज्ञेचे उल्लंघन करणे, अर्थात् आपली अशीच स्थिती राहील ह्मणजे आपणास कधीही कोणाचेही कोणत्याही प्रकारचे साह्य घ्यावे लागणार नाही. अथवा कोणावर अवलंबन राहवें लागणार नाही. असे मानून तदनुसार वर्तणें हें अल्प बुद्धिचें, मूर्खपणाचे व पश्चात्तापास कारणीभूत होय. दानशक्ति इतकी प्रचंड आहे की, तिच्या तेजांत हजारो दुगुण अलिप्त होतात. सत्ताधारीपेक्षां दान करणाऱ्याची कीर्ति या चकरूपी वायु प्रथम दूरंदेशी घेऊन जातात. ज्या देशांत नानाप्रकाराने दान [ अशक्तास साह्य करणारे परुष असतात, तो देश आशिर्वादाने आच्छादित होतो, त्यामुळे त्या देशांत दारिद्य सहसा प्रवेश करू शकत नाही. दुरंदेशी त्याची सकीर्ति जाते ह्यामुळे ज्यात्या देशाचे विद्वान त्या शाची स्थिती पहाण्यास येतात. व त्या देशाचा कित्ता आपल्यादेशबांधवांस वळविण्यास नेण्याचा प्रयत्न करितात. दान करणाऱ्या कल्पवृक्षरूपी पुरुषांच्या छायेखाली दारीद्याने तप्त झालेल्या प्रवाशांच्या झुंडी आश्रयास येऊन बसतात त्या सर्वांचे त्याने यथाशक्ति सांत्वन करावें, आद्यापेक्षा खर्च फार न करावा, नाही तर गोड उसाचे मूळही न राहील्याने पढच्यावर्षी उसाचाही नाश होऊन खाणारास साखरेवांचून राहवे लागेल असें न होवो.