पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारण एखाद्या डुकराच्या पाठीमागें पारधी लागले असले म्हणजे तो कुंपणांत किंवा फटीत आपले डोकें भयाने खुपसून डोळे झांकून टाकितो. परंतु त्याचे अफाट शरीर बाहेर राहिल्याने पारधी जास्त मेहनती शिवाय त्याचा नाश करूं शकतात. धास्तीने किंवा भयाने जे काही खरे असेल ते करण्यास मागे सरूं नका. कारण असे केल्याने तुह्मी आपला बचाव करण्यांत आपले कर्तव्यकर्म बजाविले नाही, असे होऊन तुमच्या का मांत तुमाला पश्चात्तापासह निर्फळता मात्र प्राप्त होईल. ८ धास्तीने मन मात्र घाबरून जाते. ९ धास्ती ही दुखणे आणण्यास कारण होते. १० धास्ती ही कार्यामध्ये विघ्न आणिते. ११ धास्तीने मनुष्याचे तेज नाहींसें होतें. १२ धास्तीने आपली योग्यता मनुष्य विसरून जातो. १३ धास्तीनें मनुष्य दीन होऊन आपण आपल्या नाशास मात्र कारण होतो. संतोष १ संतोष ह्या शब्दाचा अर्थ शक्य व योग्य यांतच तृप्त असणे. २ संतोष ठविल्यामुळे परमेश्वराची निंदा होत नाही. ३ संतोष हेच स्वर्गसुख होय. ४ संतोषाने आपणास दास्यत्व येत नाही. ५ संतोषाने आपण आपला बोन राखू शकतो.