पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारण तसे केल्याने एक तर त्याने वडिलाचा अपमान केला दुसरे आपल्या कुळाचार, कुळधर्म व व्यवहाराची रीत पडण्यास जी कारणे असतात ती आपणास पूर्ण माहित नसता त्यांत कारभार केल्यासारखे होईल. गृहस्थाने ज्या रीतीमुळे आपणास तोटा आहे, किंवा होईल असे वाटत असेल, तर त्याचा पूर्ण विचार करावा व सोडल्यापासून आपणास कोणत्याही प्रकारे नुकसान नाहीं (धन, मान, शक्ति, नीति वगैरेचे ) अशी खात्री होईल, तर व त्यापासून आपल्या धर्मास कोणत्याही प्रकारे न्यूनता न येईल त्यावेळेस आपल्या सर्व जातीबांधवांचा विचार घेऊन ती ( रीत ) फीरवून टाकावी किंवा रद्द करावी, परंतु असे करण्यांत घाई किंवा मीपणा अथवा एककल्लीपणा न करावा. दान. १ दान ह्मणजे आपला निर्वाह होऊन जे शेष राहील त्यांचा कां ही भाग अनाथ, अशक्त, गरीब जगाचं हितकर्ते ह्यांच्या मदतीला खर्ची घालून त्यांचे रक्षण करणे अथवा त्यांना आश्रय देणे. अनाथाचे मायबाप होणारे, अशक्ताला हात देणारे, गरीबास साह्य करणारे आणि जगाचे हितकयास मदत करणारे ह्या जगांत कीर्ति पावतात. लोकांची त्यांच्याकडे पूज्यबुद्धि असते. मोठमोठे मी मी ह्मणणारेही त्यांच्या समोर नम्रदृष्ठिनें पाहतात.