पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्या यथाशक्ति त्याचे आदरातिथ्य करून, व त्याला भोजन घालून संतुष्ट करणे व त्यांना यथाशक्ति आसरा देणे. गृहस्थ हा प्रतिष्टीत शब्द म्हणजे मानाचा आहे व जितका ज्या शब्दांत मान (प्रतिष्टा ) विशेष तितके ते शब्द प्राप्त करून घेण्यास संकट विशेष; कारण ह्या आश्रमांत आपण घरी आलेल्या भिक्षुकांस विन्मुख जाऊ न देणे, पाव्हण्याचे यथाशक्ति आदरातिथ्य करणे व घरच्या माणसांस संतुष्ट ठेवणे इतकें करावे लागते. गृहस्थाने याचकांस आसरा देणे हा त्याचा धर्म आहे, परंतु तो पात्र पाहून दिला पाहिजे; कारण दुर्जनास आसरा दिला तर तो उलट आपल्या नाशास कारण होईल आणि तो जर आळशी, व्यसनी, मूर्ख ह्यास दिला तर ते आपणास चिकटून बसतील व आपणास व्यर्थ त्रास देण्यांत त्याच्या मनाला कांहींही लाज वाटत नाही. जेव्हां आपणापासून त्यांना मदत मिळण्याचे बंद पडेल, तेव्हां ते मात्र आपला उपकार विसरून जाऊन निंदा करूं लागतील. इतकेच नाही पण, आपण त्या आळशी, व व्यसनी आणि मूर्खास त्याचे दुर्गुण वाढविण्यास आश्रय दिला असे होईल. गृहस्थानें कोणास झिडकारूं नये किंवा कोणाची निंदा करूं नये कारण तसे केल्याने आपली अपकीर्ति होऊन आपली नीचांत . गणना होईल. गृहस्थाने सावीशी नम्रतेने वागावे ह्मणजे सर्वांस आपणा विषयी संतोष होऊन आपली योग्यता वाढेल. ६ गृहस्थाने आपला कुळाचार, कुळधर्म आणि व्यवहार सोडू नये.