पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ स्वदेशद्रोही आपल्या नांवावर काळीमा आणतो, लोकांच्या मनांत आपल्याविषयी तिरस्कार व द्वेष उत्पन्न करवितो, स्वतःस अपमानास योग्य करितो. आपल्याविषयी सर्वांच्या मनांत हलका विचार उत्पन्न करवितो. व अखेरीस आपला नाश करून घेतो. यावत् जन्म दुःखांत, पाश्चात्तापांत, अपमानांत व संकटांत काढितो. स्वदेशद्रोही स्वतःच्या हिताकरितां देशाचे अकल्याण करून परक्याची नाश करितो. परंतु हा स्वदेशाचाही झाला नाही. हा जो ह्याच्या कर्णीच्या योगाने परक्याच्या मनावर वाईट ग्रह उत्पन्न होतो त्या योगाने ह्याच्यावर त्याच्या मनांत अविश्वास व तिरस्कार उत्पन्न होतो. अखेरीस हाच ( परका ) त्याच्या ( स्वदेशद्रोहाच्या ) नाशाप्त कारण होतो व ह्यामुळे त्याच्या [ स्वदेशद्रोह्याच्या ] मनांत अखेरीस आपल्या कर्णीबद्दल पश्चात्ताप व दुःख उत्पन्न होते. पण मागून काय उपयोग ? काच फुटल्यावर उगीच घाई केली असा जो विचार होतो तद्वत् याचाही परिणाम होतो. स्वदेशद्रोह्याचे आयुष्य दंभ, ढोंग, विश्वासघात, चिंता, लोभ, पश्चात्ताप, दुःख, अपमान, लज्जा ह्यांत संपते. गृहस्थाश्रम. • गृहस्थाश्रम ह्मणजे कोणा जवळ फुकट याचना न करतां आपलें स्वकष्टाने पोषण व संरक्षण करून कोणी अतिथी, प्रवासी, अनाथ, अशक्त आपल्या येथे आला तर त्याच्या योग्यतेनुरूप आप.