पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ प्याचे सार्थक मानतो व परदुःखांत भागी होतो तेव्हां मनुष्याला श्रेष्टत्व प्राप्त होते. ४ मनुष्याने सवीचें कल्याण असावे अशी इच्छा ठेवावी व कोणाची ईर्षा न करतां सवीस यथाशक्ति साह्य करावे, ह्याने आपल्या थोरवीचा विचार सर्वांच्या मनांत येऊन आपल्या विषयों पूज्यबुध्दि उत्पन्न होते. ५ मनुष्याने प्रथम स्वकुंटूबास संतोषीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कष्ट करूनही त्यांचे पोषण व संरक्षण करावे किं त्यांची आपल्यावर प्रीति रहाते. ते आपला मान ठेवितात. १ मनुष्याने हाताखालच्या मनुष्याशी देखील तिरसटपण किंवा निष्टुरपणा म्हणजे ज्यापासून त्याच्या मनांत असंतुष्टता उत्पन्न होईल असें वर्ते नये. ७ ज्या ज्या लोकांशी आपला संबंध आहे, त्यांना आपल्या वागणु कीविषयी संतोष प्राप्त झाला पाहिजे, अशी मनुष्याने काळजी ठेविली म्हणजे त्याचे आयुष्य सुखांत जाऊन त्याचे मन शांततेंत रहाते. आपल्या आयुष्याचा वेळ फुकट जाऊ न देतां त्याचा काही तरी उपयोग करावा म्हणजे तितके आपण विपत्तीस जास्त दूर केलं असे होऊन आळस म्हणजे दरिद्रता आपणापासून दूर