पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४५ स्वदेशद्रोही. १ स्वदेशद्रोही अथवा स्वदेशाचे अकल्याण इच्छिणारा व कर णारा ह्मणजे एक अज्ञान, मूर्ख जसा कुन्हाडीचा दांडा गोतास काळ असा नीच प्राणि, नाहीं कुन्हाडीच्या दांड्यापेक्षाही नीच कारण कुन्हाडीचा दांडा गोताचा नाश करतो परंतु त्याच्यांत चैतन्य नाहीं तो जड आहे. व दुसऱ्याच्या कारणाने स्वगोताच्या नाशास कारण होतो. परंतु स्वदेशद्रोही जीवंत प्राणि आहे. त्याला ईश्वराने ज्ञान दिले आहे. असे असून तो ज्ञानाची झणजे ईश्वराची अवज्ञा करून स्वतःच स्वतःच्या बांधवांच्या नाशास कारण होऊन आपले अहित करून घेऊन त्यांत चातुर्य व पराक्रम समजणारा मूर्ख प्राणि होय. स्वदेशद्रोही उपकारावर अपकार करणारा, अमृत खाऊन विष ओकणारा, शस्त्र धारण करून अनाथावर त्याचा उपयोग करणारा, सुख देणाराची निंदा करणारा, स्वमातेवरही दृष्टि करणारा, लोभाने बापाच्या गळ्यावर सुरी ठेवणारा, वचनाचा भंग करणारा, साधुजनाचा द्वेष करणारा, आप्ता, अहित इ. च्छिणारा महा नीच प्राणि होय. ३ स्वदेशद्रोही मनुष्याची कर्मे देशास धुळीस मिळवितात स्वबांध वास संकटांत टाकतात, स्वज्ञातिस नीचत्व आणतात, देशावर जलमाचा वर्षाव करवितात, द्रव्याचा नाश करवितात. व्यापाराचा हास करवितात, विद्येस बंदीवान करतात, स्त्रीयांची आज घेतात. आंतल्याआंत वैर उत्पन्न करवितात, स्वदेशबांधवास परक्या जवळ सरक्षणाची भिक मागवीतात.