पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४३ छातीवर स्वदेशी बाळगीत आहे. तर स्वमातेपेक्षाही आपण स्वदेशाचे ज्यास्त उतराई नव्हे का? आपण स्वदेशाचे ह्मणजे स्वबांधवाचे कल्याण · करण्यांत आपल्या देहाचा जर कांहींच भाग न झिजविला तर आपल्या पाठीमागे कळवळ्याच्या दृष्टीने कोण पाहील, किंवा संकटाच्या वेळेस आपली आठवण कोणास येईल का ? अथवा लौकीकवान पुरुषांत आपले नांव निघेल काय? प्रत्येक मनुष्यांत आपल्या आयुष्यात स्वदेशाची सेवा आपल्या हातून किती घडली, ह्याचा विचार करावा व स्वदेशकल्याणाच्या कामी आपल्या आयुष्याचा काही तरी भाग खर्ची घालावा कारण आपणही दुसऱ्याच्या उपकाररूपी पर्वाताने भिजलेले आहोत जीवितसाफल्य. जीवितसाफल्य किंवा आयुष्याचे चीज झणजे अशा प्रकारचे वर्तन किं ह्या जगतांत आपल्याला अडचणी किंवा दुःख प्राप्त न होतां सर्वांची आपल्याकडे पूज्यबुद्धि राहील व अंतःकाळी आपल्या मनाची आपल्या कृतकर्माच्या ठिकाणी शांतता राहील. [ परलोक प्राप्त होईल. ] २ मनुष्याला लघुत्व तेव्हां प्राप्त होतें, किं जेव्हां तो फक्त आपल्या स्वार्थात गर्क होतो. ३ ज्यावेळेस मनुष्य परोपकार करण्यांत आपल्या आयु.