पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ राहून जाते. तिसरें. आपल्या हातून इतव प्राण्याचे कल्याण झालेले असल्यामुळे आपला आत्मा शांततेत ईश्वरपदाकडे गमन करतो. चवथें. आयुष्यामध्य अपमानरूपी शत्रूची भेट घ्यावी लागत नाही, स्वदेशकल्याण करण्याच्या कामी जी जी कटें आपणावर पडतात ती ती आपला उज्वल श्रेष्ट गुण प्रकाशांत आणण्यास कारण होतात. । स्वदेशकल्याणाच्या कामी जेवढे श्रम पडतात तेवढे स्वजनाच्या प्रीतिरूप पुष्पवृष्टीत गाढून टाकण्यास कारण होतात. स्वदेशकल्याण करण्याच्या कामी जेवढे नुकसान होतें तेवढे आपल्या औदायाची व स्वदेशप्रीतिविषयी लोकांत ख्याती करण्याचे कामी खर्च पडलेले असते, त्यापैकी एक कणही वाया जात नाही. स्वदेशोंच कल्याण तें आपलें कल्याणच होय. कारण स्वदेशाच्या स्थितीवर आपली स्थिती अवलंबून आहे. कारण स्वदेश हा एक तारू[ जहाज ] होय, व आपण त्यांत एक उतारू आहों. यास्तव जोपर्यंत ती नौका सुरक्षति असेल तोपर्यंत आपणही सुरक्षीत असूं व ज्यावेळेस त्या नौकेचा नाश होईल त्यावेळेस आपणही आपत्तीरूपी समुद्रांत पडूं. स्वदेशाचे आपण फार आभारी आहों, कारण आपण जेव्हां लहान होतो तेव्हां आपल्या आईने तिच्या छातीवर आपला भार सहन केला; परंतु स्वदेशमातेजवळ आपण आजपर्यंत अज्ञान किंवा लहान आहों, यास्तव जन्मपर्यंत आपणास