पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वदेशकल्याण. स्वदेशकल्याण किंवा आपल्या देशाचे हित मणजे आपले ज्या देशांत वास्तव्य आहे, किंवा ज्या देशाच्या हिताहितावर आपली स्थिती व परिणाम अवलंबून आहे, अशा देशाची उन्नति. ज्या देशाचे आपण उतराई आहों त्या देशाचे कल्याण इच्छिणे व करणे हे आपले कर्तव्यकर्म व भूषणरूप होय. अशा देशाचें शुभ होणे ज्या देशाला माझा देश, असे आपण आनंदाने व छाती ठोकून ह्मणु शक. अशा देशाची भरभराटी होणे, जो देश आपल्या व आपल्या वडालांच्या उत्पत्तीस कारण आहे, व अखेरीस आपल्या वडीलांना ज्यांनी आश्रय दिला आहे व आपणास ज्यापाशी आश्रय मागावयाचा आहे, किंवा ज्यापासून मिळणार आहे अशा कतिस चढणे ज्या पृथ्वीने आपल्या छातीवर आपला भार सहन केला आहे, अशा देशावर सुखरूप जलाची वृष्टि होणे किंवा आनंद समुद्रांत मग्न असणे. स्वदेशाचे कल्याण करणे व इच्छिण हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्यकर्म होय. कारण स्वदेशाचे कल्याण हे पर्य याने स्वबांधवाचे कल्याण होय, आतां स्वतःचे कल्याण किंवा स्वतःचे पोट तर श्वानही भरते, तर त्यांत आणि मनुष्यांत अंतर तो काय? एक दुसरे स्वदेशाचे कल्याण केल्याने लोकाची आपल्यावर प्रीति बसते, व आपली प्रतीष्टा वाढते व आपल्या पडतीत लोक आपल्याकडे शुध्द अंतःकरणाने पहातात व साह्य करतात. आपल्या पाठिमागें कीर्तीरूप आपले वनां