पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणजे तुझ्या पडतींत तुला खाली पहावे लागणार नाही, व तुझ्यावर लोकांची पूज्यबुद्धि असल्याने तुला साह्य मिळेल. चढतीत परदुःखाची हेलसांड किंवा वेपर्वा व थट्टा करू नको. कारण असे केल्याने लोकांत तुझ्याविषयों हलका विचार उत्पन्न होईल व तुला अवेरसि लज्जेत गर्क व्हावें लागेल. चढती किंवा सुस्थिती देण्याचा परमेश्वराचा मुख्य उद्देश तुझ्या हातून दुःखीत व निबळास साह्य मिळावे असा आहे. चढतीचा किंवा तुला पाहिजे त्यापेक्षां ज्यास्त साधनाचा अथवा प्राप्तीचा तूंच उपयोग करावा असे नाही. कारण असे असते तर, ज्याप्रमाणे तुझी संपत्ति वाढली त्याप्रमाणे तुझा आहार वाढवावयाला नको का? चढती, हेतु, ज्ञान, नीति व दया ह्यापासून दूर होतोस किंवा नाही हे पाहण्याची कसोटी आहे. आज जर परदुःख पाहून तुझें अंतःकरण विरघळल, तर उद्यां पडतीत त्या विरघळलेल्या जळामुळे तुझ्या दुःखाग्नीची शान्ति होऊन ता ( दुःखाग्नि ) तुझ्या अंतःकरणास जाळू शकत नाही. परदुःख जाणणारास स्वदुःख असर करूं शकत नाही. तो लोकांत मान्यता पावतो त्याच्याविषयी सर्वांची पूज्यबुध्दि असते. त्याला संकटांत साह्य मिळते, त्याला पश्चात्ताप करावा लागत नाही. लज्जत गर्क होण्याचा प्रंसग येत नाही. अनंतकाळ जाऊन पाठीमागे सुकीर्ति राहून जाते.