पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ स्वज्ञातीचा अभिमान घर, कारण तूं त्या इमारतीचा स्तंभ आहेस आणि तुझ्याच जर मुळाशी कीड लागेल, तर त्या इ मारतीचा निभाव कसा लागेल. ९ स्वज्ञातीशी नम्र व प्रामाणिक ऐस असे केल्याने तुझी योग्यता वाढेल व तूं मान पावशील व तुझे वजन दुसऱ्यावर पडेल. १० स्वज्ञातीचे कल्याण इच्छित जा; कारण तिच्या कल्याणावर तुझेही अवलंबून आहे. ११ स्व ज्ञातीचा तिरस्कार करूं नको. कारण डाहाळ्याच्याने वृक्षा ची निंदा करवेल काय? परदुःख. १ परदुःख ह्मणजे दुसऱ्याचे, परक्याचे किंवा परिणाम अथवा असर आपणावर होणार नाही असें दुःख. २ दुसऱ्याच्या दुःखाकडे तुझें अंतःकरण कोमल कर. कारण धर्माच्या मुळाच्या शीरा दया होत. ३ परदुःख निवारणार्थ तुझ्याने होईल तेवढा तुझ्या शक्तीचा उपयोग कर कारण त्या शिवाय जगांत पश्चात्ताप रहित अक्षय आनंद देणारा झरा दुसरा नाही. परदुःख पाहून तुझें अंतःकरण कठीण करूं नको कारण असे केल्याने तूं तुझा निर्दयपणा जगापुढे उघड करून आपले नांव निंदेस व तिरस्कारास पात्र करून घेशील. ५ तुझ्या चांगल्या काळांत परदुःख निवारणार्थ प्रयत्न कर,