पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ तीच्या स्थितीवर आपली स्थितीही अवलंबून आहे. कारण वर्तन किंवा क्रियेप्रमाणे काळ व काळास अनुसरून स्थिती असते. आपली स्थिती स्वजातीच्या स्थितीवर अवलंबून असल्यामुळे तिची ( स्वजातीची ) स्थिती चांगली असणे किंवा करणे हा आपला धर्म होय. आपल्या विचाराचे किंवा आपल्या समान व आपल्या सारखे वर्तन करणारे व आपणास उपयोगी, अशांस स्वतःकष्ट सोसूनही साह्य करणे, त्यांना उपयोगी पडणे, त्यांच्या मनांत आपल्या विषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न करविणे व त्याची कृपा संपादन करणे हा मनुष्य प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. स्वज्ञातीमध्ये अहंकार ठेवू नको. कारण ते तुझ्या समान आहेत, व असे केल्याने त्याच्या मनांत तुझ्या विषयी बेपर्वा व तिरस्कार उत्पन्न होईल. स्वज्ञातीस आपल्या शक्तीप्रमाणे वेळोवेळी साह्य केल्याने तिचा बोज राहतो. परक्याच्या तोंडाकडे पाहण्याची तिला वेळ येत नाही. व आपल्या पडतीच्या वेळी आपणास मदत मिळते. स्यज्ञातीच्या मनांत आपल्या विषयी पूज्यबुद्धि उत्पन्न करणे ह्यालाच यश ह्मणतात. ह्मणजे हेच संसाराचे चीज होय. स्वज्ञातीशी वैर करूं नको कारण तसे केल्याने तुझा निभाव कसा लागेल? जळांत रहाणे व माशांशी वैर न करावें, कारण अखेरीस तूं संकटांस येऊन व पश्चात्ताप होऊन तुला दीनासारखी क्षमामागावी लागेल.