पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किं ज्या वेळेस माझें मन काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादि कांनी वेष्टिले नसून शुध्द सविचारांत लीन आहे, असें माझें कोणते कर्म आहे की ज्यांत स्वार्थाचा लेशही नसून परमार्थ मात्र राहिलेला आहे, असे माझे कोणत विचार आहेत की ज्यापासून कोणास दुःख न होतां माझं कार्य साधेल ? सारांश असें माझें कोणतेच कर्म नाही की ज्याच्या स्तुतीचे पवाडे मी गात बसं. मी जर माझ्या स्तुतीत लीन झालो तर मी दुसऱ्याच्या स्तुतीची किंमत न करता तिचा द्रोह केला असें नाहीं कां होणार? मी जितकी माझी निंदा करीन मणजे जितके मला माझे दुर्गुण कळतील, किंवा माझ्या लक्षात येतील तितके ते सुधारण्यात मी प्रयत्न करणार नाहींकां? व त्या योगाने माझी योग्यता नाही कां वाढणार ? आतां मी जितकी माझी निंदा करीन तितकी माझी योग्यता वाढण्याचा रस्ता मोठा झाला असे नव्हे काय? जर मी माझ्या प्रत्येक कर्माबद्दल निरपेक्षबुद्धीने विचार करीन, तर त्यांत स्तुतीस योग्य असें एक ही मला आढळणार नाही. मी जर माझी स्तुति करूं लागलों, तर मी माझ्या दुर्गुणांत वृद्धि करण्याची इच्छा करितो असे होईल. स्वज्ञाति. स्वज्ञाति मणजे आपली जात किंवा आपल्या मताच्या आचरणाने वागणारे. आणि ज्या जातीच्या वर्तनाच्या प्रचारावर, आचारावर आपले आचरण अवलंबून असल्यामुळे त्या जा