पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जन्म दिला; असें सर्व जग ह्मणते. एकंदरी तमाम वित्त, आनंद, कल्याण व सुख ही सर्व स्वदेशहितचिंतकाच्या अधीन असतात. आत्मश्लाघ्यनिंदा. आत्मश्लाघ्यनिंदा झणजे स्वतःच्या स्तुतीचा तिरस्कार करणे. स्वतःची स्तुति ऐकून स्वतःची खरी योग्यता विसरून फुगून न जाणे. अर्थात् स्वतःची योग्यता वाढविण्यास इच्छिणे. ज्याला स्वतःविषयींच ज्ञान नसते, तो स्वस्तुतींत गर्क हो उन आनंदसागरांत मूर्छा पावतो. ३ जर मला स्वतःची स्तुति प्रिय झाली तर माझे दुर्गण मला कसे कळतील? ह्यावरून स्वतःची स्तुति प्रिय होणे ह्मणजे स्वतः अज्ञान असण्याची इच्छा करणे नव्हे का ? १ जर मी माझ्या सद्गुणाकडे लक्ष देऊन त्यांत संतोष मानला तर माझ्या सद्गुणाची वाढ फुटणे बंद होईल व माझ्या ज्ञानाची वृध्दि होण्यांत मी प्रतिबंध केला असे होईल. मी जर माझ्या शरीराकडे नजर केली, तर त्यांतला कोणता अवयव शुध्द आहे? सर्व मलीन पदार्थाने भरलेले आहेत. माझी कोणती इद्रिय आलस्यारहीत आहेत, असा कोणता धन्य दिवस माझ्या आयुष्याचा उजेडला आहे किं ज्या दिवशी मी कायावाचामने करून सत्यतेचा लोप केला नाही अशी की, ज्या वेळेस मझें मन, काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादिकाने कोणती वेळ गेलेली माझ्या आयुष्यात मला आठवत नाही.