पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पलायन करित नाहीत. माझ्या देशाची स्थिती काय आहे ? माझा देश कोणत्या संकटाने आच्छादित आहे; माझे बांधव कोणत्या विवंचनेत गर्क आहेत; ह्याच्या शोधांत ज्याचें अंतःकरण नेहमी आत्मविचारांत फिरत आहे. स्वदेश बांधवांचीदुर्दशा पाहून ज्याचे डोळे पाण्याने भरतात, अंतःकरण दयारूपी उष्णतेने विरघळते. मी जो ह्या देशांत उत्पन्न झालों व ज्याच्या योगाने आजपर्यंत पोसला गेलो. मातेच्या गर्भातून निघालों, त्या वेळेस मी जो विष्टंत लोळत होतों, तो ह्या देशाचे अन्न, पाणी. हवा, औषधी व ह्या देशाचे माझे देशबांधवांच्या साह्याने आज ताठ उभा राहु शकतो. म्हणजे आपत्तीच्या वेळी मला जें साह्य मिळाले व पुढेही मिळणार आहे. यास्तव ह्या देशाचा जो मी ऋणी आहे, तर मी त्या कर्जाच्या व्याजाचा तरी काही भाग परत दिला किंवा नाही, ह्या विचाराचा नेहमी पथारीत निजण्यापूर्वी जो विचार करतो. स्वदेशरूपी नौकेत मी व वंशज बसलो आहोत तर माझ्या वंशाच्या कल्याणाचा आधार स्वदेशरूपीनौकेच्या सुरक्षतें वर अवलंबून आहे हे, ज्याला कळू शकते. माझ्या मातेने मला काही ( अल्प ) काळापर्यंत आपल्या छातीवर बाळगिले; परंतु ह्या स्वदेशपृथ्वीने आजन्मपर्यंत आपल्या पृष्टभागावर आश्रय दिला आहे. आखेरीस त्याच्याच उदरांत माझा समावेश होणार आहे. ह्यामुळे स्वमातेपेक्षाही मी स्वदेशाचा जास्त ऋणी आहे, असे ज्याला कळू शकते. स्वमाता ही माझ्यांत एखादा अती वाईट दुर्गण असला, तर माझा त्याग करील; परंतु मी किती