पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ मौन. १ मौन ह्मणजे शांतता नष्ट होईल. कार्याचा भंग होईल किंवा दुःख व पश्चात्ताप उत्पन्न होईल यास्तव तशा वेळी शब्दोच्चार न काढतां स्वस्थ बसणे. २ मनुष्याने मौन धारण केल्याने कलहाची उत्पत्ति होत नाही. कारण ध्वनिस प्रतिध्वनि मिळाल्यावांचून क्रोधाची उत्पत्ति होत नाही. १ आपला ज्यांत संबंध नाही किंवा ज्यांत आपणास कोणी बोलाविलें नाही, त्यामध्ये पडूं नये. कारण त्यापासून आपणास व्यर्थ त्रास पडून आपला अपमान होतो. ह्यामुळे व्यर्थ कोधाग्नीत जळून पश्चात्तापाने शांत होण्याची आपणास शिक्षा होते. ५ जोपर्यंत मनुष्याने मौन धारण केले आहे, तोपर्यंत त्याचे अव गुण दुसऱ्याच्या लक्षात येत नाहीत व त्याच्याविषयी चांगले च तर्क मनांत येतात. ६ कोधाग्नीची झळ [ लुक ] मनुष्याला लागून त्यांचे भस्म न व्हा वें यास्तव परमेश्वराने मनुष्यास मौन हा मंत्र दिला आहे. स्वदेशहितचिंतक. १ स्वदेशहितचिंतक ह्मणजे माझा देश कोणता, हे ज्याच्या नहमी आठवणीत रहाते. माझ्या देशाप्रीत्यर्थ माझें कर्तव्य काय ह्या विषयीचे विचार ज्याच्या डोक्यांतून कधीही