पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ व आश्रय मागणारा हा अनाथ व दारिद्यानें तप्त झालेला अशक्त प्रवासीरूपी होय. ३ यजमानाने [ गृहस्थ ह्मणजे स्वतःचे पोषण करून कोणास यथा शक्ति सहाय करण्याचा ज्याचा धर्म आहे तो] आश्रितांस साह्य यथाशक्ति हस्तेपरहस्ताने करीत जावें. कारण ते याचक आपणावर अवलंबून आहेत. ४ याचकानें बनेल तोपर्यंत यजमानास त्रास देऊ नये. कारण ज्याप्रमाणे शेत त्याच्या शक्तिप्रमाणे एकदा किंवा दोनदां पेरल्याने अनंतकाळ पर्यंत त्याचा उपभोग घेता येतो. परंतु वर्षातून दहा पांच वेळां पेरले, तर त्याचा काही एक उपयोग न होतां बहूतकाळ पर्यंत त्याच्या उपयोगापासून आपण मुकता. ५ याचकवृत्ति शाक्त असून करूं नये कारण तसे केल्याने दाता यजमा नास जास्त त्रास पडतो व खरे याचक संकटांत पडतात. दान ह्या शब्दाचा अर्थ व्यर्थ गमावणे असा करण्यांत येतो व याचक ह्मणने फुकट खाणारे लुटारू असा समज उत्पन्न होतो आणि आपण परमेश्वराचे व जगाचे चोर होतो. ६ यजमानानेही पात्र पाहून दान करावे, नाही तर दानाचा उप योग दुष्कर्माची वृद्धि होण्यांत होऊन देशास दैन्यावस्था प्राप्त होऊन आपणास पापाची मोट उचलावी लागते.