पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३१ हैं सुखकर होय; परंतु दैन्यावस्थेमुळे किंवा अडचणीमुळे कर्ज काढावे लागते; त्यावेळेस जरूरीपुरते काढावे कारण पुढच्या आपल्या उत्पन्नांतून आपला निर्वाह करून जे उरेल त्यांतून ह्याची फेड करावयाची आहे. ह्मणजे जितकें आपण कर्ज काढूं तितकें एकदम फेडण्याची आपल्या अंगी शक्ति नाही ह्मणजे ते कर्ज फिटेपर्यंत आपण त्या विवंचनेत (काळजीत) रहाणार आहोत. ह्यावरून जितकें कर्ज जास्त तितकें आपणास जास्त वेळ काळजीत रहावे लागेल व जितकें कमी तितके कमी रहावे लागेल. ५ कर्ज काढल्यावर त्याच्या फेडीची काळजी ठेवावी ह्मणने तिकडे दुर्लक्ष्य करून आपल्या खर्चात काटकसर न करणे, अर्थात निरंतर कर्जाच्या विवंचनेत राहण्याचे सुखकर मानण्या सारखे नव्हे काय? ६ ज्या मनुष्याला कर्ज नसते, तो स्वतंत्र असतो त्याला कोणाची लुलुपत् करावी लागत नाही. कोणाचा ओशाळपणांत नसतो. तो चिंतेत ग्रासीला जात नाही. सारांश तो सुखी असतो. यजमान आणि याचक. १ यजमान आणि याचक किंवा आश्रयदाता, आणि आश्रित ह्मण जे रक्षण करणारा किंवा आश्रय देणारा व आश्रय मागणारा व रक्षणाची इच्छा करणारा होय. २ आश्रय देणारा किंवा रक्षण करणारा हा कल्पतरुरूप वृक्ष होय,