पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० व अखेरीस पश्चत्ताप, दुःख व अप्रतिष्टेत काळाच्या शरणी जातो. कर्ज. कर्ज किंवा ऋण ह्मणने आपल्या डोक्यावर कोणाचे देणे, अथवा आपल्यावर कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क असणे अर्थात् आपण स्वतंत्र असता परतंत्र असणे. आपण परमेश्वर, मातापिता, देशराजासंबंधी मित्र व जो आपणास उपयोगी पडला आहे, त्याचे ऋणी आहोत, ह्या शिवाय इतराचे ऋणी होण्याचा जो आपण प्रयत्न करतो, त्यांत आपला मूर्खपणा आहे. कारण आपण बुद्धीपूर्वक आपली स्वतंत्रता नष्ट करतो. कर्ज काढण्यांचा जो आपणास प्रसंग येतो, त्याचे कारण आपल्या अद्यापेक्षा खर्च फार हे असले पाहिजे. व आद्यापेक्षा खर्च फार यांत कां तर आपली गैर किंवा अव्यवस्था कारण असते. कां तर आपली स्थिती कारण असते. व ज्या वेळेस आपली गैर किंवा अव्यवस्था कारण असते, त्या वेळेस आपल्या स्वतंत्रतेचा नाश होऊन आपणास मूर्खपणा व लोकाचा आपणाकडे तिरस्कार इतकी विशेष असतात आणि सर्वांत विशेष आपल्या शिरावर पश्चात्तापाचा एक बोजा पडतो, व व ज्या वेळेस स्थिति कारण असते, त्या वेळेस आपली स्वतं त्रता नष्ट होऊन लाचारी मात्र आपणाकडे येते. ४ यामुळे चालेल तोपर्यंत कर्ज किंवा ऋण न काढणे किंवा करणे