पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९ देश म्हणजे आपला हा शब्द जो त्याला लागलेला आहे, त्यामुळे आपण त्याचे होऊन राहिले पाहिजे व त्याला आपला मानला पाहिजे. आपला ह्या शब्दाचा ज्यास अभिमान नाही. तो मनुष्य नाहीं कारण ज्या वेळेस मनुष्य संसारांत असतो त्या वेळेस माझे आईबाप, भाऊबहीण, सोयेरधायेर, बायकोमुले, धनघर, जमीनमित्र ह्या शब्दाने वेष्टित असून तदनुचिंतेत मग्न असतो. त्या वेळेस मनुष्य साधु किंवा विरक्त होतो, त्या वेळेत माझा देव, माझा धर्म, माझें कर्तव्यकर्म ह्यांनी वेष्टित असतो. सांराश माझा [ आपला ] ह्या शब्दारहित कांहीं नाही. कारण परमेश्वरासही माझे भक्त, माझे हा शब्द आहेच. स्वदेशस्व ह्मणजे आपला. आपला हा शब्द किती मधुर व मनुष्याला गोड वाटतो? कारण आपला हा शब्द जेथे लागू होत नाही तेथेच भिन्नत्व उत्पन्न होऊन दंभ, लोभ, शत्रुत्व, खेद, अविश्वास, निष्काळजी ह्यांची उत्पत्ति होते, व वेळेस अपहाराची इच्छा प्रबळ होऊन नाना अनर्थ उत्पन्न करविते. तर पहा " आपला " ह्या शहाचे किती माहात्म्य आहे? "आपला" ह्या शहाची योग्यता त्याचा उपयोग व "आपला" ह्या शहाकडे आपले कर्तव्यकर्म हे ज्याला कळत नाही तो नरपशू होय. नाहींहो चुकलों तो नरपशूहू नही नीच. महानीच, निर्माल्य, निरुपयोगी, भुमीस भाररूप होय, त्याचे जीवन व्यर्थ होय. कारण त्याची स्थिति हातचे टाकून पळत्याच्या पाठीस लागणाऱ्या सारखी होते. तो मध्येच लटांबळ्या खातो