पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ २ जोपर्यंत ज्या वस्तूची आपणास गरज किंवा आवशकता असते तोपर्यंत आपणास ती वस्तु प्रिय असते व त्याची किंमत आपणास कळते. मनुष्य आपली गरज किंवा आवश्यकता ज्याठिकाणी आहे तेथें मान पावतो, व त्याची तेथे किंमत केली जाते. ४ गरज पदार्थ साखरेपेक्षां फार गोड आहे. कारण आपली ज्या ठिकाणी पार पडेल अशी मनुष्याला आशा उत्पन्न झाली म्हणजे तो त्या ठिकाणी लीन व दीन होऊन जातो. गरजेशिवाय मूर्खाच्या मनांतून अभिमानाचा नाश करणारा दुसरा पदार्थ ह्या पृथ्वीवर नाही. मूर्ख, अज्ञान, अशक्त, ह्यांना वारंवार दुसऱ्याची गरज पडते; ह्यामुळे त्याच्या नाकावरचे अभिमानाचें गुमडे वारंवार विरघळून लहान होत जाते. ह्याचा परिणाम ते सुखी होतात. सारांश सुज्ञाचा ज्ञानापासून व मूर्खाचा गरजेपासून अभिमान नाहीसा होतो. कंटाळा कंटाळा किंवा त्रास म्हणजे कोणतेही काम उद्योग किंवा प्रयत्न करण्यास प्रतिकूळ असें अल्प कारण पुढे होऊन, मनास अस्थीरता किंवा नाहिमत उप्तन्न होणे, म्हणजे निश्च : याचा भंग होणे व त्या वेळेस पुढे करूं अशावर मनाची समजूत करण. २ पुरुष व स्त्री ह्यांत स्त्रीला जी अबला मानली आहे, त्याचे मुख्य