पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ अर्थात् अस्वस्थता उत्पन्न केली. ह्याचा अर्थ आपण आपल्या वचनाचा भंग केला व त्याच्याशी विश्वासघात केला. परस्पर विश्वासावर ज्या जगांचे सर्व व्यापार चाललेले आहेत व विश्वासाला मात्र सत्यतेचा आधार आहे. आता जर आपण वचनाचा ह्मणजे सत्यतेचा भंग केला तर सर्व जगांतील व्यवहाराचा नाश केला असें नाहीं का.? आणि व्यवहाराचा नाश झाल्यावर जगाचा नाहीं कां होणार ? ज्याठिकाणी वचनाचा भंग होत नाही. तेथे परस्पर विश्वास असतो; ह्यामुळे तेथें कपट, लबाडी, दुबुद्धि, परस्पराविषयों ईष, द्वेष ह्यांचा प्रवेश होत नाही. आतल्या आंत फूट होऊन शत्रचे घर भरले जात नाहीं; निंदकांना थारा मिळत नाही व कोणाविषयी हलका विचार मनात येत नाही. एकंदर वचनाचा जेथे भंग नाही, ह्मणजे सत्यतेचा जेथे लोप नाही तेथे कोणत्याही दुगुणास थारा मिळत नाही; व परस्पर एकमेकांस सुख व्हावे अशी बुद्धि असते, व त्याप्रमाणे वर्तन करण्यांत येते ह्यामुळे ऐक्यतेची जूट कायम रहाते, व सुखाची वृद्धि होते. सारांश वचनाचा भंग न होणे हेच सुखास कारण होय. गरज ह्मणजे कोणताही पदार्थ, वस्तु, अथवा मनुष्य, बुद्धि नसल्यामळे जे आपलें अडते किंवा आपणास अडचण पडते नड येते अर्थात् आपले कार्य सिद्धीस जात नाही ह्यालाच आवश्यकता म्हणतात.