पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारण स्त्रियांच्या अंगी क्षणिक विचार म्हणजे अदृढपणा हा बहुतकरून असतो हेच होय. ह्या वरून त्रासीक किंवा कंटाळा करणारा प्राणी म्हणजे ज्याचा निश्चय अल्प व पोकळ [जे कारण विचारांती खोटें आहे हे त्यालाही कळू शकतें] कारणाने भंग होतो त्याला कोणती उपमा द्यावी किंवा योग्य आहे? कंटाळ्याचा जेथे वास असतो तेथून उद्योग पलायन करतो वं त्याचे परमस्नेही कीर्ति व लक्ष्मी ही त्याच्या पाठोपाठ धूम ठोकतात. या मुळे कंटाळा करणारा व त्याचे कुटुंब दोघेही दारीद्याने वेष्टिले जातात. त्या वेळेस त्याला कंटाळा व त्याच्या बरोबर त्रास उप्तन्न होऊन त्याचे धारिष्ट खचन जाते, त्याची ज्ञानेंद्रियें शिथिल पडतात. ह्या योगाने त्यांतून सुटण्याचा त्याच्या हातून काही प्रयत्न न होता हा दैवा अरे नशीब, असे करितां करितांदुःखांत, संकटांत, काळजीत, अपमानांत त्याचा शेवट होऊन पाठीमागे त्याच्या नावावर धिःकार मात्र राहून जातो. कंटाळा करणारा प्राणी काम न करतां तें न होण्यास काही तरी अडचणीची सबब शोधून काढतो, व आपला वांक लोकांत न दिसावा ह्या बद्दल मात्र काळजी बाळगतो. कंटाळा करणारा प्राणी काम करण्यास इच्छितो, परंतु ते पारपाडण्यास प्रयत्न करण्यापासून मागे हटतो. म्हणजे तो बदामाचा गीर खाण्याची वाच्छा ठेवितो, परंतु ती फोडण्याचे श्रम करण्यास त्याला गोड वाटत नाही. ज्या ज्या वेळेस प्रत्येक कार्यात त्याला निष्फळता प्राप्त होते त्या त्या वेळेस