पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ दुसऱ्याच्या घरी राहिल्याने आपणास अपमान सहन करावा लागतो. आपणा कडे मूर्खपणा येतो. आपली योग्यता नष्ट होते. आपणास हाजी हाजी खुशामत करावी लागते. इतकी दुःखें असतात. कारण तेथे स्वकष्टाचे खाणे नसून दुसऱ्याच्या श्रमावर आपला निर्वाह होतो. ४ दुसऱ्याच्या घरी राहिल्याने मनुष्यास दुसऱ्याची मर्जी संपा दन करण्याची विद्या येते. त्याला स्वतःची वस्त्रे शरीर व सामान ह्यांची वज व काळजी स्वतः कशी ठेवावी हे कळते. स्वतःचे काम कसे काढून घ्यावे ह्याबद्दल त्याच्या अंगांत दक्षता येते. आळस, मिजास, तिरसटपणा हा त्याच्या अंगांतून जातो दुसऱ्यास दुःख दिल्याने किंवा टोचून बोलल्याने त्याला कसे वाटते, ह्याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव असल्याने त्याची वर्तणूक प्रेमळ दयाळू होते. स्वतःचे काम स्वतः करावें हा गुण त्याच्या अंगी पूर्ण बिंबतो. एकंदरीत दुसऱ्या ठिकाणी मनुष्य राहिल्याशिवाय त्याला ज्ञान व विद्या प्राप्त होत नाही. १ वचन मणजे कोणत्याही शतने कोणत्याही प्रकारचा बरा किंवा वाईट आपला कबूलजाबाचा शह. २ जो एकदां आपण कबूलनाब दिला किंवा कोणासही ज्याप्रमाणे दम अथवा विश्वास दिला तर त्याप्रमाणे न वागण्याने त्याला दिलेल्या दमाचा किंवा विश्वासाचा नाश करून त्याच्या मनास अधीरता